महाराष्ट्र ग्रामीण

अनंत अंबानी यांची द्वारका यात्रा :धैर्य, सभ्यता आणि भक्तीची तीर्थयात्रा

Anant Ambani Padyatra: अनंत अंबानींची ईश्वराच्या शोधात सुरु झालेली यात्रा आता एका मोठ्या समुहात परिवर्तित झाली आहे.

Anant Ambani Padyatra: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांची सध्या जामनगर ते द्वारकाधीश मंदिरापर्यंत 130 किलोमीटरची पदयात्रा सुरु आहे. अनंत अंबानी दररोज 6 ते 7 तास  पायी चालत यात्रा करत आहेत. दररोज किमान 20 किलोमीटर अंतर अनंत अंबानी पार करतात. अनंत अंबानी यांचा जन्मदिवस 10 एप्रिल आहे. त्यापूर्वी ते 8 एप्रिलला द्वारकाधीश मंदिरापर्यंत पोहोचतील, असा अंदाज आहे. ही काही औपचारिक पदयात्रा नसून पूर्णपणे भक्तीचं कार्य असून भगवान कृष्णाला शरीर, मन आणि आत्माचं अर्पण आहे.

अनंत अंबानींची पदयात्रा, मौन , एकांत आणि ईश्वराचा शोध

अनंत अंबानी यांचं हे पाऊल द्वारकाधीशाच्या कृपेनं सनातन धर्माच्या आदर्शांसाठी समर्पित आहे. त्यांची पदयात्रा मौन, एकांत आणि ईश्वाराचा शोध यासाठी आहे. या यात्रेला असाधारण बनवणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनंत अंबानी कुशिंग सिंड्रोम (एक दुर्मिळ हार्मोनल विकार) आणि त्यामुळं निर्माण झालेल्या स्थुलतेनं त्रस्त असताना यात्रा करत आहेत. याशिवाय ते अस्थमा आणि फायब्रोसिस सारख्या आजारांचा सामना करत आहेत. याचा ते सामना लहानपणापासून करत आहेत. या पदयात्रेतील त्यांच्या समोरची आव्हानं सामान्यपणे स्वस्थ असलेल्या व्यक्तीला घाबरवू शकतात. मात्र, असं असलं तरी ही तीर्थयात्रा त्यांची ताकद सिद्धकरण्यासाठी नसून भीतीवर आस्था, समस्यांवर भक्ती आणि सहजतेपेक्षा अनुशासन शिस्तीच्या संदर्भात आहे.

बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री यात्रेत सहभागी 

मुकेश अंबानी यांचे सर्वात छोटे पुत्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक, अनंत रिफायनरी आणि नवीकरणीय ऊर्जा व्यवसायसह आरआयएलच्या उत्पादन विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या या पदयात्रेत बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री देखील सहभागी झाले आहेत. अनंत यांच्या भक्ती आणि समर्पणानं प्रभावित झालेले पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं की अनंत आपली यात्रा पूर्ण करताना केवळ नारळाचं पाणी घेत आहेत. अनंत अंबानी एक प्रेरणा असून आजच्या युवकांनी सनातन धर्मासाठी स्वत:ला समर्पित करावं असा सल्ला धीरेंद्र शास्त्री पंडित यांनी दिला.

अनंत अंबानींच्या पदयात्रेत सर्वसामान्य सहभागी

ईश्वराच्या शोधाच्या रुपात सुरु झालेली यात्रा एका मोठ्या समुहात बदलली आहे. या यात्रेत अनंत अंबानींसोबत त्यांचे मित्र, सहकारी, पंडित आणि सर्वसामान्य लोक सहभागी होत आहेत. अनंत अंबानी म्हणाले की,”मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्यासाठी वेदनांचा सामना करेन, मी माझा विश्वास दाखवण्यासाठी असुविधांना सहन करेन. मी नतमस्तक होईन, यासाठी नव्हे तर मी कमजोर आहे.मात्र यासाठी मी गर्वाऐवजी समर्पण स्वीकारलं आहे” या पवित्र मार्गाच्या माध्यमातून अनंत अंबानी एका पिढीशी संवाद साधतात ते म्हणतात “आपल्या भक्तीला आपला मार्गदर्शक बनवा, हे तुम्हाला विनम्र बनवेल, यामुळं तुम्ही विकसित व्हाल, जेव्हा जीवनाचा भार अधिक वाटू लागेल तेव्हा आपला विश्वास आपल्याला पुढे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button