भारतीय जैन संघटना विद्यालय, वाघोली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….

तारीख १४ (एप्रिल जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया)
वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात उपप्राचार्य पोपटराव गेठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्वल बनवले पाहिजे असे प्रतिपादन केले.
“भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या विशेष प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सिंह मॅडम, डोके मॅडम, ढेपे सर आणि जगताप सर आणि विठ्ठल भाऊ हे उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान, शैक्षणिक विचारसरणी आणि घटनात्मक कार्यावर मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला, अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांची जाणीव निर्माण होऊन एक जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.”