महाराष्ट्र ग्रामीण

राष्ट्रीय जनहित परिषद व गाथा परिवाराची सामाजिक ,शैक्षणिक विषयावर बैठक संपन्न. ता.१४जून पुणे (जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया)

बकोरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील कोलते फार्म हाऊस मगर वस्ती येथे राष्ट्रीय जनहित परिषद गाथा परिवार व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक विषय व शैक्षणिक विषय व अध्यात्मिक विषयावर मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती.या मीटिंगचे अध्यक्षता डॉक्टर चंद्रकांत कोलते राष्ट्रीय जनहित परिषद यांनी केली.

यावेळी लग्न समारंभात होणारा वारे माफ खर्च, वेळेचे बंधन पाहुण्यांचा सत्कार, पुढाऱ्यांची भाषणे, मिरवणुकीवर केला जाणारा वारे माफ खर्च ,अन्नाची नासाडी लग्न वेळेवर लावणे, काही मर्यादा याव्यात व काही आदर्श आचारसंहिता असावी या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये बेसुमार शालेय फी आकारली जाते यावर काही बंधन असावीत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता संबंधित शाळा व शिक्षण अधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे सिताराम बाजारे यांनी विविध सामाजिक विषयावर सांगो पांग चर्चा केली.या समस्या वरती येणाऱ्या अडचणी या सोडवण्यासाठी वैयक्तिक लीडरशिप करणारे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी वेगवेगळे विषयावरती प्रश्न मांडले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले गाथा परिवाराचे नानासाहेब शिवले यांनी दिंडीच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडले ,दत्ता भेंडावले श्रीमंत झुरुंगे, हरिभाऊ गायकवाड, शहाजी आवाळे यांनी तुकाराम महाराज यांच्या दिंडी विषयी नियोजन व कार्यवाही कशी करण्यात यावी याबाबत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले वाघोलीच्या रामशास्त्री दिंडीचे नाव हे अनुचित वाटते कारण राम शास्त्री नी संत तुकाराम महाराजांना प्रचंड त्रास दिल्याचं त्यांनी यावेळी मत व्यक्त केले कोणतेही काम फारच धाडसाने करावे लागते त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागते. मी पुढाकार घ्यायला तयार आहे तुम्ही ती माझ्यावर जबाबदारी सोपवा दिंडीचे यशस्वी नियोजन आणि कार्यवाही मी करतो असे प्रतिपादन यावेळी शहाजी आवळे यांनी केले याप्रसंगी गोरख अण्णा गायकवाड, हनुमंत कोलते ,प्रेमनाथ देव कांबळे आधी सर्व उपस्थित होते.पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या शालेय ही संदर्भातील समस्या समस्या काळे यांनी मांडल्या.विद्यालयांच्या , महाविद्यालयांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फी आकारली जाते.आणि पालकांच्यावर त्याचा बोजा पडतो जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते असे प्रतिपादन या बैठकीमध्ये केले.

डॉक्टर चंद्रकांत कोलते यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात हुंडा पद्धती अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा समाजाला हानिकारक असल्याची प्रतिपादन केले व त्या बंद करण्यासाठी समाजामध्ये जागृती करणे गरजेचे आहे .यासाठी गाथा परिवार व राष्ट्रीय जनहित परिषद पुढाकार घेईल व समाजामध्ये जागृती घडून येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी केले. श्रीमंत झुरंगे यांनी विषयाच्या अनुषंगाने आपले मत मांडले
रवी तात्या कंद यानी या बैठकीचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन मोहन वारघडे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button