राष्ट्रीय किसान मोर्चाची शेतकरी जागृती सभा शिवनी गावात पार पडली.

ता.१४ जून बीड ( जिल्हा प्रतिनिधि रिपब्लिक व्हॉइस इंडिया) महाराष्ट्र
शिवनी तालुका बीड जिल्हा बीड येथे राष्ट्रीय किसान मोर्चाचे वतीने शेतकरी जागृती सभा संपन्न झाली
राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक भाई इंगळे यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर आपले मत व्यक्त केले
कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना ठोस हमीभाव हवा . कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणारे असतील तर आतापर्यंत दोन तीन वेळेस कर्जमाफी केलेली आहे . सुटले का प्रश्न? नाही. उलट प्रश्न जटिल झाले. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे C2 उत्पादन खर्चावर ५०% नफा दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात ठोस अस काही पडणार नाही.
गेल्या वर्षीच्या हंगामाचच उदाहरण घ्या.
गेल्या वर्षीचा सोयाबीनचा राज्य सरकारने काढलेला १ क्विंटलचा उत्पादन खर्च होता ६०३९ रुपये. आता स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या ५०% नफा म्हणाल्यावर भाव निघतो ९००० रुपये. परंतू केंद्र सरकारने १ क्विंटल सोयाबीनला भाव दिला ४८९२ रुपये. परंतु ९०% शेतकऱ्यांना हा भाव मिळालाच नाही. शेतकऱ्यांना भाव मिळाला सरासरी ४००० रुपये. म्हणजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे होता ९००० रुपये परंतु मिळाला ४००० रुपये. म्हणजे एक क्विंटल मागे ५००० रु तोटा/Loss. समजा आमच्या शेतकऱ्याने ४० क्विंटल सोयाबीन विकल. तर त्याला दोन लाख रुपये तोटा झाला. खरिपाचे दोन लाख आणि रब्बीचे दोन लाख.म्हणजे एकूण चार लाख रुपये तोटा. कशामुळे? तर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव न मिळाल्याने. आम्हला जर स्वामिनाथन आयोगाप्रमाणे भाव मिळाला तर आम्ही आमच कर्ज एका वर्षात फेडू. पुन्हा आम्हाला कर्जबाजारी होण्याची वेळच येणार नाही.
महाराष्ट्रातील शेतकरी कोणत्याही बँकेचे एक रुपयाही कर्ज देण लागत नाही. मग बँकेच्या नोटिसा आल्यास काय करायचं? तर वजा उत्पन्नाचे दाखले शेतकऱ्यांनी काढावेत. राज्य कृषी मूल्य आयोगाने काढलेल्या उत्पादन खर्चाच्या आधारे शेतकरी वजा उत्पन्नाचे दाखले काढू शकतात.
सरकारने या उदयन मूक लढाऊ युवा नेतृत्वाला कट शह देण्यासाठी सरकारचे पाळीव मंत्री व लोकप्रतिनिधी यांना कर्जमाफीची घोषणा करण्यास पुढाकार घेण्यास सांगितल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे
सदरील सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून बामसेफ बीड जिल्हाध्यक्ष प्रा.सुमित वाघमारे, बामसेफचे वरिष्ठ कॅडर मा.मधुकर काळे, RMBKS बीड जिल्हाध्यक्ष मा.रामदास वैरागे सर,संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा सचिव मा.नारायण मुळे साहेब, भारत मुक्ती मोर्चा बीड जिल्हाध्यक्ष मा.भीमराव कुटे साहेब, राष्ट्रीय किसान मोर्चा मराठवाडा उपाध्यक्ष मा अशोक पवार सर,राष्ट्रीय किसान मोर्चा गेवराई तालुका अध्यक्ष मा.जुबेर पटेल साहेब, मा.विनोद कुटे, मा.परमेश्वर बनकर, राहुल काळे सर,मा. पांडुरंग घुटे , गावचे सरपंच सुपेकर साहेब व गावातील शेतकरी उपस्थित होते.