लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा जिल्हा धाराशिव च्या वतीने गुणवंत सत्कार.

तारीख २६ जून( जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया)
छत्रपती राजर्षी शाहू यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेना, छत्रपति राजर्षि शाहू प्रतिष्ठान वाघोली पुणे यांच्यावतीने घेण्यात आला.
यावेळी वैष्णवी विनोद चांदणे ९२.८७% ,साक्षी रमेश सहाने८७.९७,वैष्णवी रघुनाथ कांबळे ७७.८०असे गुण मिळून बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या मातंग समाजातील मुलींचा गुणगौरव करण्यात आला बहुजन समाजातल्या मुलीही संधी मिळाल्यास संधीचे सोनं करू शकतात याची प्रचिती आणून दिली.छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या.साठी शिक्षणाची दारे खुली करून मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करवीर संस्थानात त्यांनी केलेला होता .म्हणूनच आज बहुजन समाजातील अठरापगड जातीचे लोक उच्च पदावर पोहोचत आहेत भारतीय संविधानपाहि६ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि शक्तीच्या शिक्षणाचा तरतूद करून ठेवलेले आहे.हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे ज्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विलायतीमध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली आणि या देशाच्या संविधान निर्माता तयार केला ही आरक्षणाची किमी आहे ही किमया करून देण्याचे काम सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेले होते पहिलं आरक्षण जे आहे हे आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केलं आणि सामाजिक न्यायासाठी प्रस्थापित केले असे प्रतिपादन याप्रसंगी शिक्षण केंद्र संचालक लक्ष्मण धावारे यांनी बोलताना यावेळी केले .याप्रसंगी श्रावण क्षीरसागर(जिल्हाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा धाराशिव) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार दिले. आणि भविष्य काळात आमच्या मुक्ता साळवे सारख्या मुलींना कोणत्याही शैक्षणिक समस्या येणार नाहीत आणि त्यासाठी लहुजी क्रांती मोर्चा प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तसेच वैशाली धावारे (भारत मुक्ती मोर्चाच्या महिला आघाडी जिल्हा प्रभारी) यांनी बहुजन समाजाला ब्राह्मणी व्यवस्थेने देवधर्माच्या नावाखाली गुलामगिरी मध्ये बहुजन समाजाला जखडून ठेवले असल्याने आमच्या समाज अनेक वर्षापासून प्रगतीपासून वंचित आहे असे मत व्यक्त केले .
अजय गायकवाड(जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा धाराशिव) यांनी एक जुलै रोजी भारत बंद च्या संदर्भात मार्गदर्शन करून भारत बंद का ?केला आहे त्याचे मार्गदर्शन केले.आणि EVM मशीन ने मूलनिवासी बहुजन समाजाचा प्रतिनिधित्वाचा अधिकार संपवला तसेच ओबीसी समुदायाचा वापर करून देशात ब्राम्हणी सत्ता अनियंत्रित पणे झाल्याचे संगतीले आणि १ जुलै भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान बहुजन समाजातील सर्व लोकांना केले व या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रचार प्रसार पत्रकाचे वाटप यावेळी करण्यात आले.मातंग समाजातील व इतर बहुजन समाजातील महिला पुरुषांनी या १ जुलै च्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक शाहू कांबळे यांनी केले आभार प्रदर्शन लहुजी क्रांती मोर्चाचे जवळा शाखा अध्यक्ष सुनील कांबळे यांनी केले.यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे काजी सर ,राष्ट्रीय किसान मोर्चाचे पांडुरंग कदम ,राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे बालाजी शिंदे, गुरु रविदास क्रांती मोर्चाचे ,अरुण वनकळस हेही उपस्थित होते.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.वैजनाथ तुळशीराम कांबळे, विठ्ठल लक्ष्मण कांबळे, अरुण किसन कांबळे, पूनम कांबळे ,सुभद्रा कांबळे दीदी चांदणे ,मोहित ,धावारे राहुल ,धावारे बालासाहेब धावारे,शैलेश कसबे, सचिन धावारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
अजय गायकवाड
(धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक व्हॉईस इंडिया न्यूज)