भारत बंद धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तारीख २७ जून धाराशिव( रिपब्लिक व्हॉइस इंडिया जिल्हा प्रतिनिधी)
१एक जुलै २५ रोजी बामसेफ भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनाच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये भारत बंदचे आव्हान करण्यात आलेले आहे . धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा च्या वतीने आज दिनांक २७ जून २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन भाऊ कांबळे भारत मुक्ती मोर्चा ,बामसेफचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अजय गायकवाड राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तस्लीमकाजी , सहनवज् सय्यद यानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये राष्ट्रीय पातळीवरील विविध मुद्द्यांचा समावेश आहे.ईव्हीएम मशीन द्वारे मताची चोरी होत असल्याने मतपत्रिकेवरील मतदान घेण्यात यावे .ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.आरएसएस भाजपकडून महापुरुषांचा अपमान केला जातो आहे याच्या विरोधात, त्याचबरोबर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे.शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येऊ नये वक्फ बोर्ड जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा.अशा प्रकारच्या मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादरकरण्यात आले.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा चे प्रदेश प्रभारी नितीन भाऊ कांबळे , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे तस्लिम काझी व शाहनवाज सय्यद तसेच धाराशिव जिल्हा प्रतिनिधी, लहुजी क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अजय गायकवाड उपस्थित होते.यावेळी बोलताना भारत बंद का याबद्दल माहिती दिली .
पहिला मुद्दा हा EVM मशीन ने मताचा अधिकार शून्य केला त्याबद्दल
दुसरा मुद्दा OBC ची जातीगत जनगणना न करणे.
तिसरा मुद्दा वक्फ संशोधन विधेयक जे अधिनियम 26 चे उल्लंघन करून सरकार राबवत आहे
तसेच इतर अनेक मुद्दे भारत बंद असण्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि धाराशिव जिल्यातील नागरिकांना भारत बंद ठेवण्यासाठी आवाहन केले.