शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांचा गौरव

ता. १४ जून पुणे (जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया )
भारतीय जैन संघटना विद्यालय पिंपरी येथील शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांचा कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल उत्कृष्ट कार्य केल्याच्या निमित्त गुणगौरव करण्यात आला.
शनिवार दिनांक १४जून २०२५ रोजी चाकण येथील कार्यालयात शास्त्रज्ञ डॉ चंद्रकांत गव्हाणे सर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल मुख्यमंत्री कार्यालयाचे ऑफिस प्रमुख श्री राजेन्द्र शिंदे साहेब आणि खेड तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री .अडवले सर पुणे महानगर पालिकेचे अधिकारी श्री.मुबारक तांबोळी साहेब तसेच श्री .दशरथ शेठ वाळुंज साहेब राज्य समन्वयक भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत शास्त्रज्ञ डॉ चंद्रकांत गव्हाणे सर यांचा पुष्पहार शाल श्रीफळ आणि मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तक देवून गौरविण्यात आले…
या प्रसंगी खेड तालक्यातील वाफ गाव येथे ग्राम पंचायत आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सेंद्रिय शेतकरी मेळाव्याचे आयोजन पुढील आठवड्यात करणार असल्याचे आनंद विहार ग्रुप चे सदस्य श्री मुबारक तांबोळी यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारकडून दखल घेतली जाण्याची शक्यता आहे व त्यांना प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही
प्राध्यापक श्री चंद्रकांत गव्हाणे हे भारतीय जैन संघटना विद्यालयात जुनिअर कॉलेजला प्राध्यापक असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर व त्यांच्या समस्येवर उपाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहे.त्यांच्या या उपक्रमामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना लखपती होण्याची संधी प्राप्त झालेली आहे गांडूळ खत प्रकल्प निर्मिती, हार्वेस्टिंग वॉटर इत्यादीचे प्रयोग त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केलेले आहे या कामाबद्दल परिसरामध्ये त्यांचा कौतुक केले जात आहे. सरकारने कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यावर उपाय म्हणून शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्याचे काम झाले पाहिजे असे चंद्रकांत गव्हाणे यांचे म्हणणे आहे.अन्नदाता आजही उपासमारीचे दिवस काढत आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नाही शेतीमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते यातून त्यांची सुटका करण्यासाठी श्री.गव्हाणे यांनी शेती क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविलेले आहेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातून त्यांच्या उपक्रमाची मागणी होत आहे.