सरकारी गायरन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्यात यावी.

ता. १४ जुलै ( जिल्हा प्रतिनि
जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील गायरन जमीन धारक यांनी सरकारी गायरन जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून कसत असून महाराष्ट्र सरकार व जिल्हाधिकारी यांना वारंवार पाठपुरावा करून निवेदन देऊन जमीन कसणाऱ्यांच्या नावे नोंद करून ७/१२ वर नोंद करण्याची विनंती केली असताना त्याची दखल घेण्यात आली नाही.
सदर जमिनीवर बहुजन समाजाच्या महार, मांग, चर्मकार , पारधी या सारख्या जाती समूहाचे लोक उदर निर्वाह, उपजीविका करतात . कधी कधी गावगुंड कडून लोकप्रतिनिधींना हाताशी धरून या लोकांवर अन्याय अत्याचार केला जातो.
आज मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या धरणे आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष सचिन भाऊ बनसोडे यांना हा प्रश्न सरकार दरबारी पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे निवेदन उस्मानाबाद जिल्हा प्रभारी बजरंग धावारे यांनी दिले.
लौकरच याबाबतीत उस्मानाबाद जिल्ह्यात गायरन जमीन धारक यांची बैठक घेऊन संबंधित यंत्रणेच्या कडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी आझाद मैदानात विविध आंबेडकरी विचार धारेच्या लोकांनी धरणे आंदोलन सहभागी झाले होते.
या प्रसंगी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटॉन चे प्रा. डी. बी. धावारे, बीन पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम बराते, मल्लिकार्जुन शिवशिंगे, विद्यार्थी मोर्चा चे प्रतीक भोसले व राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन समाजाचे प्रमुख अतिथी उपस्थित होते.धी रिपब्लिक व्हॉईस इंडिया) मुंबई