महिलांसाठी पिंक रिक्षा प्रशिक्षण शिबिर संपन्न

वाघोली पुणे ता. २० जुलै
(जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाइस ऑफ इंडिया) अलीशा तांबोळी
येथील जेनसर व आस्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ दिवसाचे दिनांक (२/७/२०२५ ते २०/७/२०२५ या कालावधीत पिंक रिक्षा प्रशिक्षण व परवाना शिबिर ग्रामीण व शहर विभागातील सर्व महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते.
महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवून स्वतःच्या उत्पन्न स्वतःच उभा करता यावे , कौटुंबिक गरजा भागवत असताना तुटपुंज्या पगारात दमछाक होता कामा नये या साठी दोन्ही संस्थानी हा उपक्रम सुरू केला असून अनेक गरीब गरजू महिला यातून सक्षम होत आहेत.
संस्थेने राबविलेल्या या कार्यक्रमात अनेक महिलांनी हिरारीने भाग घेतला असून त्यांच्या उत्पन्नात भर पडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ह
हे प्रशिक्षण शिबिर पूर्ण करण्यासाठी स्वराज्य ड्रायव्हिंग स्कूल यांनी मोलाचं सहकार्य केले आहे
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे दि. 2/07/2025 ते 20/07/2025.
१५ दिवसांचे “पिंक रिक्षा चे प्रशिक्षण ” आणि “परवाना या कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण व वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. झेनसार व आस्था फाउंडेशन यांच्या वतीने हे १५ दिवसांचे प्रशिक्षण राबवण्यात आले असून, त्यामध्ये गरजू महिलांना याचा लाभ घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केले. स्वराज ड्रायव्हिंग स्कुल यांनी मोलाचे मार्गदर्शन करुन महिलांना (ऑटो) चालवण्याचे प्रशिक्षण दिले.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी
सरकारी अनुदानातून महिलांना मिळणार पर्यावरणपूरक ई-रिक्षा