बामसेफचे २६वे राजस्थान राज्य अधिवेशन बाड़मेर येथे यशस्वीरित्या संपन्न रिपब्लिक व्हॉइस ऑफ इंडिया (मानसी कुऱ्हाडे, जिल्हा प्रतिनिधी – राजस्थान)

बामसेफचे २६वे राजस्थान राज्य अधिवेशन बाड़मेर येथे यशस्वीरित्या संपन्न
रिपब्लिक व्हॉइस ऑफ इंडिया (मानसी कुऱ्हाडे, जिल्हा प्रतिनिधी – राजस्थान)
बामसेफ (राष्ट्रीय मूलनिवासी संघ) चे २६वे राजस्थान राज्य अधिवेशन बाड़मेर येथील महावीर टाऊन हॉलमध्ये यशस्वीरित्या पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन आदरणीय योगी अभयनाथ चंचल (प्राग मठ, बाड़मेर) यांच्या हस्ते झाले. मुख्य अतिथी म्हणून प्रो. निर्मल देसाई (महाराणा प्रताप महाविद्यालय, चित्तौडगड) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेब (नवी दिल्ली) यांनी भूषवले.
या अधिवेशनात बामसेफचे विविध पदाधिकारी, समाजसेवक, सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक, अभियंते, वकील, युवा कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला प्रतिनिधी, आणि बहुजन समाजातील बुद्धिजीवी व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यामध्ये धर्मपाल सिंह (प्रदेशाध्यक्ष, बामसेफ राजस्थान), के. एल. पासी, विशाल राय, संदीप सूर्याल, मोती बाबा फुले, तगाराम खती, डॉ. सीता खटीक, शिव कुमार मौर्य, गोमाराम रमेशा, गीता बोस, शिवदाना राम राठोड, भंवरलाल मेघवाल, तोलाराम फाचरिया, ओमप्रकाश वर्मा, राजू रैगर, गजेंद्र द्रविड, भोमराज जनागल, फोजाराम भील, प्रेम पंवार, एड. मोतीराम मेनसा, किशनलाल परमार, एड. पाँचराज बनल, रामकरण जाट, सिद्धार्थ देशभ्रलार, नरसाराम मेघवाल, मघाराम हाथला यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
वामन मेश्राम साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ओबीसींच्या जाती आधारित जनगणनेबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. २०११ च्या सामाजिक आर्थिक जनगणनेचे आकडे जाहीर न करणे ही एक गंभीर बाब असून यावर व्यापक चर्चेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हेही सांगितले की, बामसेफच्या विचारधारेशी शंभर टक्के सहमत राहून कार्य करणे, हीच खऱ्या कार्यकर्त्याची ओळख आहे.
“चला गावाकडे” अभियान राबवणे, राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभारणे, सहकार्य करणाऱ्या संस्थांचे नेटवर्क तयार करणे, तसेच असंवैधानिक ईव्हीएमच्या दुरुपयोगाविरोधात आवाज उठवणे यावरही त्यांनी ठामपणे विचार मांडले.
कार्यक्रमाचे मंच संचालन स्वरूप पंवार (प्रदेश महासचिव, बामसेफ राजस्थान) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बामसेफ बाड़मेर जिल्हाध्यक्ष प्रमोद जयपाल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे, अतिथींचे आणि संपूर्ण राजस्थानातून आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
राजस्थान प्रतिनिधी//..मानसी कुराडे