ता.२ जुलै जिल्हा प्रतिनिधी धाराशिव महाराष्ट्र (रिपब्लिक वाईस इंडिया)

भारत मुक्ति मोर्चा तर्फे भारत बंद
भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बुधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ,बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर सहयोगी आणि समर्थन संघटना तर्फे १ जुलै२०२५ भारत बंद करण्यात आला
EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ने मूलनिवासी बहुजन समाजाचा मताचा अधिकार शून्य केला आहे आणि भारत देशातील बहुजन समाजाच्या प्रतिनिधीत्वाच्या हक्काला संपवण्याचे काम ब्राम्हण ब्राम्हणवाद करत आहे.
ओबीसी ची जातीआधारीत जनगणना करुन मराठा कुणबी समाजाला आरक्षण देण्यात यावे आणि त्यांचे योग्य प्रतिनिधित्व समाजामध्ये उभे राहावे हा देखील मुद्दा भारत बंद मध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता
तसेच वक्फ संशोधन विधेयक जे भारतीय मुस्लिम समाजाची धर्म स्वंतत्रता च्या नियमाचे उल्लंघन करून हे सरकार राबवत आहे त्यासंधर्बात भारत मुक्ती मोर्चा तसेच इतर सहयोगी संघटनेच्या वतीने भारत बंद करण्यात आला
तसेच अमित शहा द्वारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान केला त्या संदर्भात भारत बंद करण्यात आला.
तसेच देशाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाला योग्य हमी भाव द्यावा आणि कर्जमाफी करावी तसेच पिक विम्याचा क्लेम योग्य वेळी करुन द्यावा आणि शेतातील वीज २४ तास सुरू ठेवावी असे मुद्दे भारत बंद मध्ये घेण्यात आले आणि भारत बंद मध्ये सहभागी होऊन कळंब मध्ये देखील बंद करण्यात आले.
त्याचप्रमाने वृद्ध व्यक्तीच्या पगारी वेळेवर न होणे ,विद्यार्थाचे प्रश्न,
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अजय गायकवाड , बुद्धीस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे जिल्हाध्यक्ष बिभिषण गायकवाड,लहुजी क्रांती मोर्चा चे पदाधिकारी किसन कांबळे,सुनील कांबळे,तसेच BIN चे पदाधिकारी प्रशांत नरसिंगे ,भारत मुक्ती मोर्चा महिला विंग च्या वैशाली धावारे,मोहिनी गायकवाड,उमा गायकवाड, तसेच भारत बंद संघर्ष समिती आणि समर्थन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि सर्व भारत वासियांना भारत बंद मध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि याचा परिणाम म्हणून सरकार ने लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण करावया असे प्रतिपादन केले
अजय गायकवाड
(रिपब्लिक इंडिया व्हॉईस न्युज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी)