वर्षावासानिमित्त भंते बुद्धघोष यांचे धम्म प्रवचन_ता.२७ ऑगस्ट धाराशिव /उस्मानाबाद (रिपब्लिक वाईस इंडिया) जिल्हा प्रतिनिधी अजय गायकवाड

ता.२७ ऑगस्ट धाराशिव /उस्मानाबाद (रिपब्लिक वाईस इंडिया) जिल्हा प्रतिनिधी अजय गायकवाड
भीम नगर कळंब येथे वर्षावासानिमित्त धम्म प्रवचनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 23.8.25 रोजी आयोजित करण्यात आला.वर्षावासाच्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत मनुष्याने कोणता आहार घ्यावा, आणि कसा विहार करावा, कुशल कर्म करून पुण्य संपादन करावे याबाबत प्रवचन केले.आजचा तरुण मग तो कोणत्याही समाजाचा असो तो व्यसनात पुरता आकंठ बुडून गेलेला असून,आजची महिला रमाईच्या नावावर घरकुल घेते मात्र घरात रमाईचा फोटो न लावता नको त्या देवदेवतांचे फोटो लावते. कुटुंबातील वाईट चालीरीती आणि अंधश्रद्धा पाहून आपले मन उद्विग्न झाल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे आणि त्याला योग्य संस्कार देण्यामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे आई,वडील,पालक अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याची खंत भंते बुद्धघोष यांनी व्यक्त केली. स्वतःच्या मातेचा मृत्यू झाला तरी अग्निसंस्कार व रक्षाविसर्जन या दोनच दिवशी उपस्थित राहून धम्म प्रवचनासाठी 14दिवसात बारा गावांना प्रवचन देऊन, वर्षावासाचे व आहार विहाराचे महत्व भंते बुद्धघोष यांनी पटवून दिले.याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी डी.जे व डॉल्बी नावाचा राक्षस आ वासून उभा राहिलेला असताना “नाचणारा” होणार, की “वाचणारा” होणार, जसा तू होणार, तसा तुझा “पोरगा” होणार? समाजाला प्रश्न पडलाय,की आजचा तरुण “नाचणारा हिजडा” होणार की “बेवड्यांचा बाजार”होणार? अशा शब्दात नाचणाऱ्या आणि बेवड्या तरुणांना फटकारले.याच प्रसंगी मा. नगरसेवक अमर (अण्णा) गायकवाड यांचे चिरंजीव इंद्रसेन यांच्या आठव्या वाढदिवसा प्रसंगी धम्मदेशना देण्यात येऊन समाजाचा आदर्श नागरिक बनावा अशी मंगल कामना केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे शहर सचिव मारुती दादा गायकवाड, निलेश गांजीकर, धीरज गायकवाड,मुकेश गायकवाड, नितीन गायकवाड,प्रेम कुमार गायकवाड,बापूराव जोगदंड,रुपेश गायकवाड, सौ शितल श्याम गायकवाड, बेबी गायकवाड,रमाबाई गायकवाड, प्रतिभा हौसलमल, पुनम गायकवाड, ठाणा आंबिरेताई, करुणा गायकवाड,यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन लक्ष्मण धावारे यांनी केले.