मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात बीजेएस विद्यालय प्रथम

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत वाघोलीच्या भारतीय जैन संघटना विद्यालयास हवेली तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे रुपये 3,00, 000 बक्षीस पात्र झाले.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत विद्यालयांमध्ये जागृती करून विकासाला चालना प्राप्त करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील शाळांनी सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मूल्यांकनाची प्रक्रिया पार करून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामध्ये वाघोली च्या भारतीय जैन संघटना विद्यालयाने हवेली तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त करत 3,00,000 चे बक्षीस मिळवले. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील वर्षी सुद्धा याच अभियाना अंतर्गत विद्यालयास हवेली तालुक्यातील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले होते.
या यशाबाबत बीजेएसचे संस्थापकशांतीलालजी मुथ्था , प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, शाळा समितीचे अध्यक्ष अरुण नाहर तसेच प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपटराव गेठे यांनी समिती प्रमुख विष्णू देवडकर, संदिप लोणकर, तसेच सर्व समिती सदस्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे शालेय व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत.