महाराष्ट्र ग्रामीण

अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन तारीख 11 एप्रिल (पुणे जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक व्हाईस इंडिया)

लोणीकंद येथील अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक हर्षल ढगे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थेचे संस्थापक लक्ष्मण ढगे ,सचिव स्वप्निल ढगे, विश्वस्त संध्या मॅडम, धनश्री मॅडम व, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ शिक्षक धावारे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी तात्या साहेब उर्फ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक जागृतीमुळे या देशातील स्त्रियांना शिक्षणाची सर्वोच्च संधी मिळाली आहे. आज राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री पोहचली आहे वेगवेगळ्या अधिकारी पदावरती, वैमानिक, इंजिनियर, डॉक्टर, वकील , शिक्षक, शास्त्रज्ञ, अंतराळामध्ये संशोधन करणाऱ्या सुनीता विल्यम सारख्या महिला असतील या सर्व महिलांना सर्वोच्च मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम ज्या शिक्षण व्यवस्थेतून झालेले आहे. ती शिक्षण व्यवस्था महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या देशांमध्ये उभी केली वंचित आणि उपेक्षितांना ज्या मनुस्मृतीने आणि चातुरवर्णी व्यवस्थेने शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. अर्धी लोकसंख्या शिक्षणापासून वंचित ठेवलेली होती. जाणीवपूर्वक महापुरुषांच्या विचारापासून आमच्या माता भगिनी दूर जात आहे असे दिसत आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशातल्या वंचित उपेक्षित दलित आदिवासी या सर्वच समाज घटकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे काम केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार देण्याची तरतूद लिखित स्वरूपामध्ये केली. परंतु दुर्दैवानं आजही आमच्या देशातल्या उच्चशिक्षित स्त्रिया या महापुरुषांनी केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवता दैववादाकडे आणि कर्मकांडाकडे अधिक झुकलेल्या दिसून येतात असे खेदाने म्हणावे वाटते. असे प्रतिपादन प्रा. डी बी धावारे यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button