व्यक्तिमत्व विकास शिबीर (धम्म संस्कार शिबीर) वाडेबोल्हाई (वाडेगाव) वाडेबोल्हाई (वाडेगाव) ला व्यक्तिमत्व विकास शिबीर :-

वाघोली ता.५मे (जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक व्हाईस इंडिया)
वाडेबोल्हाई (वाडेगाव) ता.हवेली,जिल्हा-पुणे.येथे दिनांक २ मे ते १२ मे या कालावधीत व्यक्तिमत्व विकास शिबीर (धम्म संस्कार शिबीर) आयोजित करण्यात आले आहे.
उन्हाळी सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी भिम संघ तरुण मंडळ बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क कोरगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समिती छत्रपती राजश्री शाहू प्रतिष्ठान वाघोली, चक्रवती सम्राट अशोक बुद्ध विहार,ज्ञानप्रसार बहुउद्धेषीय संस्था केसनंद.
यांच्या संयुक्त विद्यमाने भिम संघ तरुण मंडळ,बोधीवन बुद्ध विहार वाडेबोल्हाई (वाडेगाव) या ठिकणी २ मे ते १२ मे २०२५ (बुद्ध पौर्णिमा) या कालावधीत मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात स्पोकन इंग्लिश आलीशा तांबोळी,संगणक बेसिक-मानसी कुऱ्हाडे,कराटे प्रशिक्षण विष्णू दहीरे ध्यान धारणा धम्म उपासना योगा चित्रकला प्रशिक्षण,श्रमदान शिबीर,आरोग्य तपासणी,मैदानी कसरत,शिवणे व उमाले रिटायर मिल्ट्रीमन यांनी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.या शिबिरात कवी विजय अंधारे सर,शिव व्याख्याते मच्छिंद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी, भूषण शिंदे,शिवम शिंदे,दिपा शिंदे,राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे प्रा.डी.बी.धावारे,भंते नागघोष भंते,दिव्य – साधना शिंदे मल्लीकार्जुन,सुशील वाघमारे प्रदीप गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.