बुद्धिवान बुद्ध विहारात धम्म संस्कार शिबिर संपन्न तारीख 15 पुणे( जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया)

वाडेगाव वाडीबुलाई तालुका हवेली जिल्हा पुणे येथील बोधीवन बुद्ध विहारात दिनांक 2 मे ते १२ मे या कालावधीत धम्म संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.
दहा दिवसाच्या या निवासी शिबिरात भदंत नागघोश थेरो मार्गदर्शनाखाली छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान वाघोली पुणे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, बोधीवन बुद्ध विहार वाडेगाव चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार केसनंद, भीम संघ तरुण मंडळ वाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात स्पोकन इंग्लिश कु.आलिशा तांबोळी, संगणकाचे बेसिक ज्ञान कु.मानसी कुराडे तसेच शुभान शिवणे रिटायर मिल्ट्रीमॅन यांचे शारीरिक कसरत कवायत त्याचबरोबर विविध व्याख्यात्यांची व्याख्याने विविध खेळ मनोरंजन योगा या उपक्रमाच्या माध्यमातून हे शिबिर यशस्वी करण्यात आले येणाऱ्या काळामध्ये धम्माचा अभ्यास व धम्माचा संस्कार येणाऱ्या पिढ्यांना मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरेगाव भीमा विजयराज स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे यांच्या आर्थिक सह्यातून व अन्य धम्मदान दाते च्याकडून या शिबिराचा खर्च करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले यांनी शिबिरार्थींना लागणारे किराणा मालाचे साहित्य उपलब्ध करून दिले त्याचबरोबर राहुल मोरे यांनीही पाच हजार धम्मदान दिले विशाल आदमाने त्याचबरोबर विशाल गायकवाड बापूसाहेब कांबळे , ाकडे मॅडम धाबे मॅडम यांनी 12 मेला बुद्ध पौर्णिमेला खिरद दान वाटप केले अन्य दानदात्यांकडून दोन्ही वेळचे जेवण चहा नाश्ता शिबिरार्थी उपासक उपाशीका यांना देण्यात येत होते निवासी स्वरूपामध्ये हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डी. बी धावारे, भूषण शिंदे ,शिवम, शिंदे दीपक शिंदे, मल्लिकार्जुन शिवशिंगे गायकवाड नाना, अनिल गायकवाड भाजीपाला साहित्य पुरविले ज्ञान प्रसारक व उद्देश संस्थेचे दहिरे साहेब यांनी परिश्रम घेतले प्रदीप गायकवाड यांनी पाली भाषेचे वर्ग घेतले तसेच मेजर उमाले, नंदू छत्तिसे, नितीन सोनवणे या कार्यकर्त्यांनी शिबिरार्थींना यथायोग्य लागणाऱ्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी परिश्रम घेतले. दादासाहेब कांबळे व्यसनमुक्ती केंद्र प्रणाली कांबळे शिबिरार्थीला मार्गदर्शन केले.दिनांक 12 मेला वैशाख पौर्णिमाला या कार्यक्रमाची सांगता झाली शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन शिबिराचा समारोप करण्यात आला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डी.धावारे केले सूत्रसंचालन प्रांजली कांबळे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य सोनाली शिंदे यांनी केले