इनाम वर्ग जमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमावर कारवाई करण्याची मागणी

तारीख 30 मे (पुणे जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया) मौजे कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील गट नंबर 209 शेत्र शून्य हेक्टर 79 व बेकायदेशीर हस्तांतरणाद्वारे गैर मार्गाने सक्षम प् प्राधिकारच्या पूर्व परवानगीशिवाय बेकायदेशीर प्लॉटिंग व अनधिकृत बांधकाम बंद करण्याची व गुंड प्रवृत्तीच्या इसमावर कारवाई करण्याची मागणी संतोष शिवाजी जगताप राहणार ढोक सांगवी यांनी निवेदनाद्वारे संबंधित अधिकारी यांच्याकडे केलेली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष शिवाजी जगताप यांच्या मालकी हक्काची वडिलोपार्जित जमीन इनाम वर्ग ब कारेगाव गट नंबर २०९ शेत्र ० हेक्टर ७९आर वर बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदीखत करून घेऊन विक्री हस्तांतरण व अनधिकृत बांधकाम सुरेखा कैलास नवले सुनील माणिक चंद ओसवाल दिलीप भट्टू करंजुले, आप्पासाहेब सोनबा जगदाळे, शारदा बबन कटके, त्रिंबक जयवंत ओव्हाळ व चंद्रकला परशुराम ओव्हाळ यांनी केले असून ते बेकायदेशीर असल्याचा दावा दुय्यम निबंधक कार्यालय शिरूर, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, अतिरिक्त आयुक्त पुणे लोक युक्त मुंबई माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब यांच्याकडे संतोष शिवाजी जगताप यांनी तक्रार व हरकती दिल्या आहेत.पुनम कमलाकर जगताप यांनी १८७२/ ८/५/२००८ शेतजमीन वाटपाचा lease पेन्डन्सी दस्त दुय्यम निबंधक कार्यालय शिरूर येथे नोंदवला आहे.तरी बेकायदेशीर दस्त खरेदी होत आहे. दिवाणी न्यायालयात वाटपाचा 138/2008 ने न जुमानता दावा प्रलंबित आहे
तरी गूंड प्रवृत्तीने प्लाटिंग व अनधिकृत बांधकाम करीत आहे.सदरची जमीन अनुसूचित जातीच्या जगताप यांच्या मालकी हक्काची असून वरील इसमांनी सरकारी नजराणा व शेतीव्यतिरिक्त वापरास ५० टक्के नजराणा न भरता मूळ वतनदार यांना सब रजिस्टर कार्यालयात न बोलवता दस्त निष्पादित न करता व सह्या न घेता जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा क्रमांक पी टी के एस १३०/ २००८ नुसार शेती प्रयोजनार्थ विक्री व्यवहार हस्तांतरण परवानगी किंवा दुरुस्ती आदेश न मिळवता वडिलोपार्जित जमीन बेकायदेशीर व गैर मार्गाने दहशतीच्या जोरावर प्लॉटिंग व अनधिकृत बांधकाम करीत आहे.अशा गैरमार्गाने गुंड प्रवृत्तीने महसूल अधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशीर प्लाटिंग व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन जगताप यांनी केलेले असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.अशा आशयाचे निवेदन पुणे जिल्हा अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे केलेला आहे.मंडळ अधिकारी संजीव पुंडलिक साळवे आर्थिक गैरव्यवहार करून तक्रार केस बाबत या जागेचा पंचनामा जाणीवपूर्वक केला नाही.त्यांच्यावर वरीष्ठ अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई केली नाही.या सर्वावर कायदेशीर कारवाई कधी होणार?? याबाबत निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे साहेब यांना लवकरच देणार आहे.