वाशी धराशिव येथे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

ता. १८ मे (जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया )
बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने* रविवार ,दिनांक – १८ मे २०२५, रोजी सकाळी १० ते सं. ६ या वेळे दरम्यान जोंधळे मंगल कार्यालय, तांदूळवाडी रोड,ता. वाशी, जी. धाराशिव या ठिकाणी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून शेकडो समाज बांधव उपिस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये बहुजन समाजापैकी मराठा,धनगर,मातंग,चर्मकार,बंजारा ,ढोर,वाणी,पारधी,वैदू,बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षण मा. प्रा. विकास पथरीकर (राज्य संयोजक – बहुजन क्रांती मोर्चा) यांनी घेतले. उदघाटक म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक मा. डॉ. दयानंद कवडे
उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये खालील प्रमाणे मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. मा.प्रा. मारुती लोंढे,हनुमंत कवडे,प्रा. अशोक दूनघव,बाजीराव कागदे,श्रावण क्षीरसागर, आणि आलेल्या मान्यवरांचे स्वागत मा. प्रभाकर कसबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नितिनभाऊ कांबळे ( भारत मुक्ती मोर्चा – महाराष्ट्र उपाध्यक्ष) यांनी केले. येत्या काळी धाराशिव जिल्ह्यांमध्ये बामसेफ,भारत मुक्ती मोर्चाचे कार्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचवण्याचा निर्धार सर्व मान्यवरांनी व्यक्त केला