मातंग समाज विविध समस्या संदर्भात परिसंवादाचे आयोजन*

ता. १७जून( जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक वाईस इंडिया)
लहुजी क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या.वतीने* शनिवार ,दिनांक – ७ जून २०२५, रोजी संध्या. ६ ते रात्री १०.30 या वेळे दरम्यान क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे सभाग्रुह, जवळा (खुर्द), ता. कळंब , जी. धाराशिव या ठिकाणी मातंग बांधव बहुजन बांधवानसाठी परिसंवाद आयोजित केला होता.* या परिसंवादासाठी जवळा व आजूबाजूच्या परिसरामधुन मातंग व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपिस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मराठा,धनगर,मातंग,चर्मकार,बंजारा ,ढोर,वाणी,पारधी,वैदू,बौध्द ,माळी *बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची अध्यक्षता मा. नितिनभाऊ कांबळे (प्रदेश कार्याध्यक्ष – लहुजी क्रांती मोर्चा) यांनी केले. या कार्यक्रमामध्ये खालील प्रमाणे मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. श्रावण क्षीरसागर (जिल्हाध्यक्ष लहुजी क्रांति मोर्चा), मा. धावारे डीबी ( राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटन पुणे जिल्हा उपाध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. अजय गायकवाड ( धाराशिव जिल्हाध्यक्ष – भारत मुक्ती मोर्चा) यांनी केले. यावेळी भारत मुक्ती मोर्चा च्या धाराशिव जिल्हा प्रभारी वैशाली भिका धावारे लहुजी क्रांती मोर्चा चे सुरेश कांबळे यांनी येत्या काळी लवकरच जवळा गावामध्ये लहुजी क्रांती मोर्चाची शाखा उघडणार आहेत असे प्रतिपादन केले धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोर्चाचे कार्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचवण्याचा निर्धार सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू कांबळे विठ्ठल कांबळे शहाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले