भारतीय जैन संघटना विद्यालय येथे फिरती विज्ञान प्रयोगशाळा – लिक्विड नायट्रोजन प्रयोगांचे थरारक

वाघोली, पुणे दि. २५जून
अलीशा तांबोळी (जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक व्हॉईस इंडिया)
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि SPPU अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञानातील आधुनिक प्रयोगांचे सजीव सादरीकरण अनुभवायला मिळाले.
या कार्यक्रमात लिक्विड नायट्रोजन यासारख्या आकर्षक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी थक्क करणाऱ्या या प्रयोगांमधून विज्ञानातील गूढता, प्रयोगशीलता आणि सृजनशीलतेचा अनुभव घेतला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष भंडारी यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले. पर्यवेक्षक पांडुरंग पवार सिनिअर कॉलेजचे डॉ. शिवाजी सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक धावारे सर सर्व विज्ञान शिक्षक, आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करणारा आणि विज्ञानाची आवड जोपासणारा ठरला. उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील अद्भुत सादरीकरणाचा मनःपूर्वक आनंद घेतला आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेतली.