भुसावळ राज्य अधिवेशनाच्या तयारीसाठी निगडी येथे बामसेफची कोपरा सभा यशस्वीरीत्या पार पडली (रिपब्लिक व्हॉईस ऑफ इंडिया, जिल्हा प्रतिनिधी – आलिशा तांबोळी)

दि. 27 जुलै 2025 रोजी भुसावळ येथे होणाऱ्या बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी संघाच्या 39व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच संघटनात्मक विस्तारासाठी निगडी (यमुनानगर) येथे बामसेफचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. दिनकर जाधव सर यांच्या निवासस्थानी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेच्या अध्यक्षस्थानी मा. सुमेध साबळे सर (जिल्हाध्यक्ष, बामसेफ पुणे) होते. त्यांनी उपस्थितांना प्रबोधनपर पद्धतीने मार्गदर्शन करत संघटन वाढीसाठी प्रेरित केले. तसेच राज्य अधिवेशनात सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
सभेची सुरुवात बामसेफचे ज्येष्ठ पदाधिकारी मा. रवी कोशल सर यांच्या प्रस्ताविकाने झाली. यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे (RAEP) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. कनवर वळवी सर, बामसेफचे मा. दिनकर जाधव सर, मा. गणेश वारूळे सर, मा. सिद्धार्थ कदम सर, भारत मुक्ती मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष मा. सविता सोनवणे मॅडम आणि महिला संघाच्या मा. साक्षी बनसोडे मॅडम यांनी विषयानुरूप आपली मते मांडली.
या सभेत निगडी, चिखली, मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मा. सिद्धार्थ कदम यांच्या पुढाकाराने 21 कार्यकर्त्यांचे अधिवेशनासाठी रेल्वे आरक्षण करण्यात आले असून, जनआंदोलन निधी म्हणून 15,000 रुपये जमा करण्यात आले, ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरली.
ही सभा यशस्वी करण्यासाठी निगडी, चिखली, मावळ आणि पिंपरी चिंचवड येथील बामसेफचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सभा यशस्वीपणे पार पडल्याने आगामी अधिवेशनासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.