महाराष्ट्र ग्रामीण
नुकतीच आज मुरुड रेल्वे स्टेशन संदर्भात ; मुरुड रेल्वे थांबा संघर्ष समिती तर्फे सोलापूर डिव्हिजनल ऑफिसर पाटील साहेब यांना मुरुड रेल्वे स्टेशन विकसित करणे व तसेच रेल्वे स्टेशनला सर्व गाड्यांचा थांबा देणे या संदर्भात निवेदन देण्यात आले

यासाठी रेल्वे थांबा संघर्ष समिती मध्ये यावेळी उपस्थित समितीचे अध्यक्ष मा.विष्णू टेकाळे निवृत्त मेजर ), अंकुश नाडे सर( जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ),मा. बी.एन. डोंगरे साहेब ( उपजिल्हाप्रमुख शिवसेना उबाटा गट), समितीचे कार्याध्यक्ष डॉ.हनुमंदास चांडक साहेब, युवक काँग्रेसचे मुकेश (बाबा)सवासे, इंजि. शिवलिंग चौधरी साहेब, निवृत्त मेजर रामराव मोरे साहेब,मा. भगवानराव घुटे, दत्ता गोरे (पत्रकार दैनिक बाळकडू ),समितीचे सदस्य मा. विकास कापसे ई. उपस्थित होते,
मुरुड रेल्वे स्टेशन संदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली, मुरुड रेल्वे स्टेशन लवकरच मूलभूत गरजा संदर्भात तात्काळ कारवाई करेल आणि रेल्वे बोर्ड लवकरच योग्य मार्गी लावण्याचा आश्वासन माननीय साहेबांनी दिले.
#मुरुड रेल्वे
#15 ऑगस्ट जन आंदोलन