ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले यांना प्रतिष्ठा पुरस्कार – प्रामाणिक कार्याची दखल

रिपब्लिक व्हॉईस इंडिया (जिल्हा प्रतिनिधी आलिशा तांबोळी)
ता. १९ ऑगस्ट, वाघोली, पुणे
वाघोली येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी मिलिंद देवचंद महाले यांना प्रतिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितींवर मात करून त्यांनी गाठलेले यश व समाजासाठी केलेले कार्य यांची या पुरस्कारातून दखल घेण्यात आली.
संवाद साधताना महाले यांनी सांगितले की ते सदैव महापुरुषांच्या विचारधारेवर चालत आले आहेत. सन १९९६ पासूनच्या आपल्या कार्यकिर्दीत त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच सामाजिक व राष्ट्रीय जबाबदाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाप्रमाणे प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत.
अनेक जिल्ह्यांत आपल्या कामाचा ठसा उमटवताना त्यांनी बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविल्या. त्यांच्या प्रामाणिक व समर्पित कार्याचे कौतुक ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.